"शेवटी "जनली" ती रस्त्यावरच...!"
काय शब्द वापरतो आहेस तू यार...! सुशिक्षित आहेस ना तू.. मग तुझी ही अशी अभद्र भाषा..?
काही चुकीचा शब्द नाही वापरत आहे मी. मी परत तेच म्हणेण - " ती 'जनली'." असेच बोलेन मी.
वृत्तपत्रांनी जरी लिहले असले, की "बाईने रस्त्यावरच जन्म दिला एका बाळाला", "त्या स्त्री ची प्रसुती झाली भर रस्त्यात".
![]() |
| woman delivers child |
अरे शिक्षणामुळे तुम्ही तुमची भाषा कितीही शुध्द वापरली, सुंदर वापरली तरी तुमची वागणूक ही शेवटी तेवढीच घाण आहे ना मित्रा.
वृत्तपत्रांनी, बाळाला रस्त्यावर जन्म दिल्याच्या बातमीला शुध्द शब्दात मांडले म्हणून काय तिला झालेल्या वेदना कमी झाल्या का? किंवा तिच्या भररस्त्यावर कुत्रीसारख्या जनन्याला तू कितीही 'प्रसुती-प्रसुती' बोलला म्हणून का तिची झालेली दैना-पिडा तू कमी करू शकतोस का?
अरे तिच्यावर अशी भर रस्त्यावर बाळाला जन्म देण्याची पाळी का आली हा विचार कर ?
गरीबीमुळे आणि माणुसकी नसलेल्या डॉक्टरमुळे. पैशापुढे आपण आपली माणुसकी गहाण टाकतो ती अशी. तिच्याकडे अॉटोला देखिल पैसे नव्हते. तिचं जसं पोट दुःखायला सुरवात झाली तिने पैदलच जवळचा दवाखाना गाठला. परंतु त्या हरामखोर डॉक्टरला तिच्या कळा दिसल्या नाहित, त्याला दिसला तो तिचा फाटका अवतार त्याने तिच्या जीवीताचा जराही विचार न करता सरळ दवाखान्याची पायरी दाखविली.
मित्रा, "गरीबी लाचार असली तरी स्वाभिमानी असते." ती तशिच मागे फिरली , तिने सरळ सरकारी दवाखाना गाठायचा प्रयत्न केला. परंतु दवाखाना दूर असल्या कारणाने पैदल चालतानाच तिच्या अचानक कळा वाढल्या. अशा परिस्थितीत नाईलाज असतो रे , शेवटी रस्त्यावरच तिची प्रसुती झाली.
दैव सोबत असेल म्हणून वेळेवर लोकांनी पुढाकार घेतला व त्या महिलेचा व तिच्या बाळाचा जीव वाचला.
अरे डॉक्टरांनी निदान पेशन्टची काय कंडिशन आहे ? हे तरी बघावं. आयुष्यभर पैसा पैसा .. ?
अरे हा डॉक्टर त्या महिलेसोबत असा वागला नसता तर तिची परिस्थिती एका जनावरासारखी झाली नसती रे.
आणि तु म्हणतोस, "काय तुझी ही अशी भाषा?" तुच बघ. तुला मी वापरलेला "जनली" हा शब्दच इतका वाईट वाटला. त्या महिलेला काय वाटलं असेल रे, जिची भररस्त्यावर प्रसुती झाली.?
"फक्त भाषा आणि राहणीमान सुधारून, तुला तू माणूस आहे असे वाटत असेल तर तू खूप मोठ्या भ्रमात आहेस मित्रा. हे लक्षात ठेव.."
आणि माझ्यासारख्या अडाण्याला तिचं असं रस्त्यावर बाळाला जन्म देणं, हे जनावरासारखं "जननंच" दिसणार. काय करु?, माझ्या डोळ्यांनी मला घटना जशा आहे तशाच दिसतात. मला त्या विनाकारण शिक्षणाचा आव आणत सुशिक्षितपणाच्या पडद्याआडून नकोस बघायला लावू.. नाहीतर अशा प्रकारे वागणाऱ्या डॉक्टरांचा साधा निषेध नोंदवायची हिम्मतही माझ्यात उरणार नाही रे...!
Read Me On Facebok Click Here
©ले. सुधीर त्र्यें. पाटील
कारंजा (लाड) जि. वाशिम
मो. 8149999678

0 comments:
Post a Comment