सुंदरता मूर्ख बनविते....

                       .....सुंदरता मूर्ख बनविते.....

अ गं , ती पोरगी दिसायला एकदम सुंदर होती, म्हणून डोळे बंद करून घेतली करून. पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पोरीचा खरा रंग दिसायला लागला ना. नविन नविन पंधरा विस दिवस त्यानंही केलंच गं सहन. पण बायकोला जरा जास्तच भाऊ आहेत आणि सख्या भावापेक्षा येदरच्या बेदरच्या भावालाच आपल्या बायकोची काळजी म्हटल्यावर त्याला थोडी शंका आली. अगं, त्यानं केला ना मोबाईल चेक . मग काय, I Love U(आय लव यू) पासून ते I kiss U (आय किस यू) आणि भलतेच काय काय मेसेजेस होते म्हणतात बाई.. अ गं फोटो तर खूपच विचित्र होते म्हणतात. एवढं कुठला नवरा सहन करतो. आता आलीय म्हणते फारकती(डिअॉर्स) पर्यंत गोष्ट.
Sudhir Patil
https://www.facebook.com/100001834519986/posts/3208201465917639/?app=fbl
                     असं असतं, त्याला माझ्या सख्या चूलत भावाची पोरगी दाखवली होती पण दिसायला ती थोडी सावळी होती म्हणून यानं नापसंत केली. बिचारी खेड्यातली असुन शिकलेली आणि संस्कारी होती. अशी या पोरीसारखी सतरा धगडे फिरवणारी तर नव्हती ना.. पण पोराला अपसरा पाहिजे होती.
             घे म्हणाव , अपसरेने भरलाय आता चांगलाच दरबार. आता चालूय कोर्टाच्या फेऱ्या मारणं. तुला सांगते गं बाई , मी तर माझ्या मुलासाठी थोडी दिसायला डावी ,साधारण, सावळी असली तरी चालते पण संस्कारी पोरगीच बघणार बाई.. असं नको व्हायला---
           "पांढरी पाल
            शेजारच्यांची माल
          अन् नवऱ्याचे हाल"
हसू नकोस , खरंच असं आहे कुठे कुठे...
अ गं हो . पण प्रत्येक मुली नसतात गं तशा.. अशीच आपली गम्मत. आपण नाही का दिसायला सुंदर..! पण आपण नाही केलेत गं बाई असे धंगडे.. चला , खूप कामं पडलीयात.. अजून सासूबाई ओरडेल..  पण एक सांगू का "आज कालची मुलं-मुलीना फक्त चांबडीचा रंग बघतात आणि तिथेच फसतात. अ गं कित्तेकांना हि सुंदरताच मूर्ख बनवत असते बरे..!"
विचार माझ्या किंवा तुझ्या  नवऱ्याला....😄😄😄😄 हस हस

ले. सुधीर त्र्येंबकराव पाटील(  👈🏻  फेसबुकला भेट द्या)
मो. 8149999678
कारंजा (लाड)
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments: