गांधीवादात आतंकवादाची बीजं....?

       "साबरमतीके संत तुने कर दिया कमाल,
देश को दी आजादी ना खडगं ना ढाल..."

जेव्हा हे गाणं कानावर पडलं त्याचा मी आजवर कधी इतका विचार केला नव्हता. पण १४ तारखेला आतंकवाद्यांकडून (आतंकवाद परोपजीवी असतो. त्याला पाकिस्तान खतपाणी घालतोय हे साऱ्या जगात उघडच आहे.)झालेला CRPF वरचा हल्ला मला गांधींची आठवण करून गेला. खरंच आज गांधी असते तर त्यांनी आजही अहिंसेचीच वाट धरली असती का? आतंकवादावर अहिंसा अथवा मानवतावाद हे उत्तर असु शकतं का? असे असेल तर हिन्दुस्थानाच्या संरक्षणासाठी राजे महाराजांनी केलेले बलिदान, भगतसिंग-राजगुरू-सुखदेव-अनंत कान्हेरे असो वा सुभाषचंद्र बोस , बळवंत फडके-तात्या टोपे-झाशीची राणी असो अथवा सावरकर-लोकमान्य टिळक असो यांच्या हौतात्म्याला काहीच अर्थ उरणार नाही.
terrorism , Mahatma Gandhi


पुरोगामी मानवतावादावर भर देत पाकिस्तानशी वैर कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना अजूनही कळलेले दिसत नाही कि विरोधी गटातील , शत्रू गटातील प्रत्येक व्यक्ती ही प्रत्यक्ष शत्रू नसली तरीही त्याच वेळेला ती अप्रत्यक्षपणे मात्र वैचारिक का होईना शत्रूत्वाची भावना मनात ठेवतच असते. आणि प्रत्यक्ष आतंकवाद्यांपेक्षा आतंकवादी विचार मनात बाळगणारे जास्त घातक असतात. एखाद्या राष्ट्राची ताकद ही तिथल्या जनतेच्या इच्छाशक्तिवर निर्भर करत असते. उदाहरण द्यायचे झालेच तर इजराईल हा ८० लाख लोकसंखेचा देश १५० करोड लोकसंख्याअसलेल्या ५६ देशांना पुरून उरतो, हे केवळ शक्य होते ते तिथल्या राष्ट्रभक्त जनतेमुळे. आपल्या हिन्दुस्थानात उलट घडताना दिसतंय, देशातील काही निवडक पुरोगामी मानवतावादाचा-गांधीवादाचा चश्मा लावून देशातील राष्ट्रभक्त जनतेचे मनपरिवर्तन करू पाहतायत त्यांना दुबळे बनवून त्यांच्या हाती अहिंसेच्या कुबड्या देतायत. करायचेच असेल परिवर्तन तर आतंकवाद्यांचे अथवा त्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे हे मतपरिवर्तन करू शकतील का?

मार्कस फ्लेव्हियस रेनाटस म्हणतात- "If you want peace Preapare for War." तुम्हाला शांतता हवी असेल तर युध्दासाठीही तुम्हाला तयार असावच लागेल. युध्द हा पर्याय नसला तरी आत्मरक्षनार्थ प्रतिकार करणे चुकिचे नसतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रतिकार करणे शक्य होत नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला गुलामगिरीच पत्करावी लागणार आहे , यावर दुमत नसावं. पाकिस्तानातील जनतेबद्दल मानवतावाद दाखवणे म्हणजे आत्मरक्षनासाठी पाकिस्तानातील आतंकवाद्यांवर केलेल्या हल्याची निंदाच करणे होय. पाकिस्तान अथवा हिन्दुस्थान हे फक्त दोन वेगवेगळी नावं नसुन त्यातील देशातील जनतेच्या भावना ह्या त्या देशाच्या धोरणाशी जोडलेलल्या असतात. त्या त्या देशातील बहुतांशी लोक स्वदेशाच्या हिताचाच विचार करतात. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं विमान पाकिस्तानच्या F16 विमानाला हाणून पाडताना स्वतःचही मिग21 विमान क्रॕश झालं व ते पाकिस्तानी हद्दीत पडलं. तेव्हा त्यांना प्रथम मारहान ही पाकिस्तानी जनतेनी केली. त्यावेळी त्यांनी कुठलीही सहिष्नु भावना, मानवतावादी कृती दाखविली नाही. पाकिस्तानी नजरेने बघितले तर हे त्यांचं राष्ट्रप्रेमच आहे. जेव्हाही दोन अथवा अधिक देशांमध्ये तनाव वाढतो तेव्हा त्या त्या देशातील जनतेमध्ये देखिल तनाव वाढतो व ती जनता अप्रत्यक्षपणे का होईना एकमेकांचे शत्रूच ठरतात. तेव्हा त्या देशातील जनतेची झालेली उपासमार , झालेली आर्थिक कोंडी किंवा होत असलेला त्रास याचा विरोधी देशाने विचार करू नये. उलट विरोधी देशातील जनतेची विविध मोर्चांवर कोंडी कशी होईल याचा विचार करावा, जेनेकररून आतुन दबाव निर्माण होऊन विरोधी देश वठणीवर येईल.

              वैष्विक मानवतावादी दृष्टिकोन बाळगायचे ठरवले तर आधी राष्ट्राराष्ट्रामधील सीमा पुसून टाकाव्या लागतील. ते भूतोनभविष्यती  शक्य नाही. सत्य अथवा अहिंसा ही तत्वे वैयक्तिकपातळीवर योग्य असली तरी सामुदायिक अथवा वैष्विक पातळीवर योग्य असतीलच असे म्हणता येत नाही. एवढाच मानवतावादाचा पुळका पुरोगाम्यांना आहे तर त्यांनी देशाची फाळणी होऊच नये यासाठी प्रयत्न केले असते. पण त्यातही ते धर्माचे दाखले देत, अल्पसंख्यांकाचे हित संबंध यांची कारणं देत परत मानवतावादाचाच गवगवा करताना आपल्याला दिसुन येतात. परंतु हे करत असताना हिन्दुस्थानातील जनतेची ते पिळवणूकच करत असतात. एकीकडे आपल्या एअर फोर्सनी केलेल्या एअर स्ट्राईकचेही पुरावे मागून फक्त जंगलात बॉम्ब टाकून हिन्दुस्थानी विमानं परतली असे म्हणतात तर दुसरीकडे २००-३०० आतंकवादी मारले म्हणून व पाकिस्तानशी तोडलेल्या संबंधामुळे, पाकिस्तानी जनतेला झालेल्या त्रासामुळे या पुरोगाम्यांना मानवतावाद आठवतोय. मानवतावाद किंवा अहिंसा ही आतंकवाद्यांबद्दल दाखवायची नसते. १९४७ मध्ये पाकिस्तानात हिन्दुंची संख्या २७% होती आज ती २% एवढी राहिली. मानवतावादी शिक्षणाची खरी गरज आज पाकिस्तानला आहे असे वाटत नाही का? परंतु पाकिस्तानी शिक्षण प्रणाली ISIS व हिजबुल यांच्या तत्वावर काम करताय की काय असे भासते. पाकिस्तानी मदरशांमधून मानवतावाद किंवा अहिंसा शिकवली जात असती तर मला नाही वाटत त्यांनी आतंकवाद्यांची फौज सीमेवर तैनात केली असती

             https://www.facebook.com/sudhirtpatil14

          आतंकवादी त्यांचा राष्ट्रवाद धर्माशी जोडून ठेवतो. व पाकिस्तान आतंकवाद्यांना. मुस्लिम देशावर संकट म्हणजे धर्मावर, ईस्लामवर संकट असेही ते मानतात. याच हेतुपुरस्सर पाकिस्तान आतंकवाद्यांना खतपाणी घालत असावं असे वाटते. या अशा विचाराचा व कृतीचा प्रतिकारही तशाच प्रकारच्या विचारांनी व कृतिने करायचा असतो. मग तो हिंसक का असेना. राहण्याची सुरक्षितता आणि भरल्यापोटी अहिंसेच्या व मानवतावाद्यांच्या गोष्टी करणं सोईस्कर असतं.पण जेव्हा आतंकवादाची अथवा हिंसेची झळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत हे पुरोगामी ज्ञान पाजणारच. अगदी गद्दारी बुडापर्यंत पोहचली यांच्या. देश ज्या संकटाचा सामना करत आहे त्यावर अहिंसा किंवा मानवता याचा विचार करून चालणार नाही. तुम्हाला अशा वेळी गांधींना विसरून सावरकरांना अंगीकारावं लागेल. गांधींनच्या अहिंसेला विसरून संत तुकाराम महाराजांचीच -
"भले तर देवु काखेची लंगोटी
नाठाळाच्या माथी हाणू काठी"
अहिंसा नसानसात भिनवावी लागेल. कुठल्याही प्रसंगी फक्त गांधीवाद वापरून प्रश्न सुटत नाही. गांधीवाद शौर्याचे दमन करतं. जनतेत नपुंसकत्व आणतं. सतत सहिष्नु अथवा अहिंसा हि तत्त्वे वापरून प्रतिकार करता येत नाही. त्यामुळे याचाच फायदा घेऊन आतंकवादी कारवाया वाढतात. त्यांना कळतं आपण कितीही अराजकता माजवली तरी आपले कुठलेही नुकसान होणार नाही उलट आपला धर्म वाढेल, इस्लाम वाढेल-फुलेल असा त्यांना विश्वास बसेल. २६/११ नतरच हा प्रतिकार करायला हवा होता पण तसे झाले नाही कदाचित तेव्हाच असा प्रतिकार केला असता तर शायद आज घडलेला पुलणामा घडलाच नसता. परंतु गांधींच्या मानवतावाद, अहिंसेने आपणाला शण्ड बनवले,नपुंसक बनवले. आणि याच गांधीवादी तत्वांमुळेच हिन्दुस्थानात आतंकवाद फोफावला तर नसेल ना? अशीच शंका येते.
ले. सुधीर त्र्येंबकराव पाटील
कारंजा (लाड) जि. वाशिम
मो. ८१४९९९९६७८
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments: