रोजच्याच मनावर होणाऱ्या बलात्काराचं काय गं आई....?

रोजच्याच मनावर होणाऱ्या बलात्काराचं काय गं आई......


"ये, विसर आता. किती दिवस बघत बसणार आहेस, त्याच त्या युट्यूब वरील तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचा मिडियाने केलेला प्रचार - प्रसार....? पोरी, पाच वर्षे झालीत त्या घटनेला. किती दिवस हे गोड गाल खारट करशील.....?"

"आई, आठवतय का तुला , आज कोणती तारीख आहे ते ? आई, मी बर्थडे विसरेन एकदाची पण ही तारीख ... नाही आई नाही. नविन शहर , नुकताच जॉईन केलेला जॉब, डोळ्यांत भविष्याबद्दलचे रंगबेरंगी स्वप्न रंगवत, रूमकडे परतण्यासाठी निसंदेह केलेली टँक्सी कधी जंगलाच्या दिशेने वळली कळलच नाही गं. आई , आई मी तुझ्यासमोरसुध्दा कपडे चेंज करायला लाजायची , आठवतेना तुला ? त्यारात्री झालेल्या प्रकारानंत्तर मिडियाने मला संपूर्ण जगासमोर नग्न केलं गं.....!
Rape
Rape


आज २८ वर्षांची आहे मी. बाबांना बघतेय मी , गेल्या दोन वर्षांपासुन माझ्या लग्नासाठी नातेवाईकांच्या घराच्या येरझारा मारताना. पण काहीएक उपयोग नाही त्याचा. एकही मुलगा तयार होत नाहीये लग्नासाठी. का ? का तर माझा बलात्कार झाला म्हणूनच ना ?

आई , आज कित्येक मुली प्रेमाच्या नावाखाली, मुलांच्या रूमवर आपल्या रात्री काढतात. शरीरावरचे कपडे उतरवतात , नग्न होतात. दोन तीन वर्षे फिजिकल रीलेशनशिपमध्ये राहतात व सरते शेवटी घरच्यांनी लावून दिलेल्या मुलासोबत समाजमान्य रीतीरिवाजाने लग्न करतात. आई, त्या मुला-मुलींच शिल नसतं का गं मलिन झालेलं ? त्यांना असे मुलं मुली चालतात लग्नासाठी. बलात्काराने ग्रासलेली चालत नाही.....! का तर बलात्काराची बातमी होते म्हणून.....

हिच ती हजारो लाखोंची जनता ना गं जी माझ्यासाठी मेनबत्या घेवून बलात्काराचा निषेध नोंदवत रस्त्यावर उतरली होती ? हिच ती जनता ना गं जी ने मोर्चे सुध्दा काढले होते ? आई, याच जनतेपैकी एक पण तरूण हातात मेनबत्तीच्या जागी वरमाला घेऊन माझ्यासाठी चौरंगावर उभा न व्हावा. ही केवढी शोकांतीका.....

आई, शरीरावर एकदाच बलात्कार झाला गं पण याच जनतेकडून रोजच मनावर बलात्कार होतोय , त्याचं काय गं आई......? आणि तू म्हणतेस विसर.....

Read me on Facebook
✍ले. - सुधीर त्र्येंबकराव पाटील
            कारंजा (लाड) जि. वाशिम
            मो. 8149999678
(©चोरण्याचा प्रयत्न करू नये. लिखाणाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.  आवडल्यास आवर्जून शेअर करा)
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

6 comments: